Ad will apear here
Next
‘सुला’च्या ‘सीओओ’पदी निक प्रिंगल यांची नियुक्ती
नाशिक : ‘सुला विनयार्डस्’तर्फे नुकतीच निक प्रिंगल यांची चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील अग्रणी आणि वेगाने प्रगती करत असलेल्या ‘सुला विनयार्डस्’मध्ये नवे सीओओ निक, ‘सुला विनयार्डस्’चे संस्थापक व सीईओ राजीव सामंत यांच्यासोबत कंपनीची धोरणे व प्रशासकीय बाबींसंदर्भातील कामे सांभाळणार आहेत.

या संदर्भात राजीव सामंत म्हणाले, ‘निक प्रिंगल ‘सुला’मध्ये सीओओ म्हणून रुजू होत असल्याने मी खूप आनंदी आहे. निक यांना अॅकोलेड वाइन्स, एबी इनबेव येथील अनुभव आहे. ‘सुला विनयार्डस्’ची जबाबदारी सांभाळण्यासाठी ते सक्षम आहेत व आशियातील झपाट्याने विकसित होत असलेल्या ‘सुला’ला ते वेगळ्या उंचीवर पोहोचवू शकतील.’

वाइन आणि स्पिरीट उद्योगात निक यांना तब्बल वीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काम पाहिले आहे. तसेच वाइन व स्पिरीटसाठी उदयोन्मुख बाजारपेठ विकसित करण्यात योगदानही दिले आहे. अजूनही भारतीय बाजारपेठेत वाइन क्षेत्राला भरपूर संधी उपलब्ध असल्याचे त्यांचे ठाम मत आहे.

निक प्रिंगल म्हणाले, ‘भारतीय बाजारपेठ तारुण्यावस्थेत व आकर्षक स्थितीत आहे. येथे वाइन उद्योगाच्या विकासासाठी संधी उपलब्ध आहेत. उद्योग संक्रमणावस्थेत असतानाही सुलाने वाइन उद्योगात दाखल होत वाइन उद्योगाला भक्कम स्थान मिळवून दिले. उद्योगाचे बदलते स्वरूप ओळखून सुलाने ‘सुला सिलेक्शन’ लाँच करून उद्योगात अव्वल स्थानसुद्धा निश्चित केले. महत्त्वाकांक्षी बदल घडविणाऱ्या ‘सुला’चा हिस्सा होत असल्याचा मनस्वी आनंद होत असून, यापुढे सुला आणखी मैलाचे दगड गाठेल असा विश्वास वाटतो.’

यापूर्वी निक यांनी एबी इनबेव येथे बारा वर्षे काम केले आहे. त्यानंतर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करण्याच्या दृष्टीने त्यांनी बदल स्वीकारत ‘अॅकोलेड वाइन्स’मध्ये रुजू होऊन हार्डीज ब्रँडला बळकटी मिळवून दिली. तेथे त्यांनी आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण व मध्य अमेरिका, आशिया व उपखंडात तसेच दक्षिण युरोपमध्ये या क्षेत्रात काम केले आहे. मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका व भारत या त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख बाजारपेठा राहिल्या आहेत. विशेषत: भारत बीअर व अन्य स्पिरीट्‌सपासून वाइनकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचे त्यांना जाणवले. या कालावधीत त्यांनी ‘सुला’सोबत भागीदारी स्वरूपात काम केले होते. २०१६मध्ये निक यांची नियुक्ती चीन अॅकोलेड वाइनचे प्रमुख म्हणून झाली.

आता त्यांनी ‘सुला’सोबत काम सुरू केले असून, कंपनीतील प्रशासकीय पातळीवर नेतृत्व करण्याची जबाबदारी निक यांच्यावर असणार आहे. सुला लीडरशिप टीमसोबत आणि ‘सुला’चे संस्थापक व सीईओ राजीव सामंत यांच्यासोबत काम करताना निक यांच्यावर कंपनी वेगळ्या उंचीवर पोहोचविण्याची जबाबदारी असणार आहे.

कोणताही व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी मदत करण्यात निक यांना अभिमान वाटतो. ‘सुला’चा नव्याने भाग होतानाच त्यांनी या क्षेत्रातील वीस वर्षांच्या अनुभवासोबतच स्वत:मधील अफाट कौशल्येदेखील आणली आहेत.

जगभरात कामानिमित्त फिरताना वाइन उद्योग, व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाल्याने ते स्वत:ला भाग्यवान समजतात.
वैयक्तिक पातळीवर निक यांनी ‘अष्टपैलू’ म्हणून आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

उत्सुकतेची बाब म्हणजे वाइन आणि स्पिरीट क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी निक हे व्यावसायिक क्रिकेटपटू होते. व्यावसायिक क्रिकेटपटू निक प्रिंगल चमकदार आयुष्य जगले आहेत.

अगदीच ड्रेसिंग रूममधील क्रिकेटमधील दिग्गज असलेल्या सर इयान बोथम, सर व्हिव रिचर्डस्‌, जो गार्नर, स्टीव्ह वॉ, मार्टिन क्रुई ते जिमी कुक यांपासून ते नामवंत बहुराष्ट्रीय कंपनी ‘अॅकोलॅड वाइन्स’मध्ये काम करण्यादरम्यानच्या आठवणी त्यांच्याकडे आहेत. ‘यूके’मध्ये वाढलेले निक हे नेहमीच क्रिकेटचे चाहते राहिले आहेत. तसेच सोमरसेट या आपल्या होम काउंटीमध्ये १९८६ ते ९१ दरम्यान क्रिकेट खेळण्याची संधी त्यांना मिळाली होती. रंजक गोष्ट म्हणजे सोमरसेटमध्ये १९८०मध्ये सुनील गावसकर यांनी एका सत्रात मार्गदर्शनदेखील केले आहे. अन्‌ लिटील मास्टरने ‘यूके’मध्ये दाखविलेली कौशल्ये निक यांना आजही स्पष्टपणे आठवतात.

क्रिकेटमधील करिअर करताना निक यांनी एबी इनबेव येथे १२ वर्षे काम केले. नंतर नवनवीन भूमिका स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून २०११ साली ते ‘अॅकोलेड वाइन्स’मध्ये रुजू झाले. आता ते आपला मुलगा मॅथिव्हला क्रिकेट खेळताना पाहण्यात व कधी तरी त्याच्यासोबत क्रिकेट खेळण्यात आनंद मानतात. त्यांना रग्बी खेळायला, तर फुटबॉल हा खेळ पाहायला आवडतो. त्यांची तंदुरुस्ती उत्साह वाढवणारी आहे. तसेच त्यांना संगीत आणि पर्यटनाचीही आवड आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KYXVBD
Similar Posts
सुला विनयार्डस् ठरली सर्वाधिक वेगाने वाढणारी भारतीय कंपनी नाशिक : भारतीय आर्थिक विकास आणि संशोधन संस्थेतर्फे (IEDRA- Indian Economic Development & Research Association) सुला विनयार्डस् या भारतातील वाइन कंपनीला ‘सर्वाधिक वेगाने वाढणारी भारतीय कंपनी’ म्हणून २०१७ सालच्या पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. भारतात वाइन संस्कृती निर्माण करण्यात आघाडीवर
हेरिटेज वायनरी रिसॉर्ट झाले पर्यटकांसाठी खुले नाशिक : ‘भारतातील दर्जेदार वाइनचे उत्पादन करणारा प्रदेश अशी नाशिकची ओळख ‘सुला वाइन्स’ने निर्माण केली आहे. ‘सुला’च्या ऐतिहासिक वाइन केंद्राच्या निसर्गरम्य परिसरात, आता टस्कन शैलीची अंतर्गत सजावट असलेले बुटीक रिसॉर्ट सुरू करण्यात येणार आहे. १९९८पासून ‘सुला’ या देशातील अग्रगण्य वाइन उत्पादक कंपनीने
‘सुला’ला मिळाले दहा पुरस्कार नाशिक : दर्जेदार वाइन निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या ‘सुला विनयार्डस्’ने आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत. अत्यंत मानाचा समजला जाणारा व जागतिक स्तरावर प्रशंसनीय असा ‘ड्रिंक्स बिझनेस अॅवॉर्ड’ ‘सुला’ला मिळाल्यानंतर पुरस्कारांच्या श्रृंखलेत आणखी एका पुरस्काराची भर पडली आहे. ‘सुला’ला ‘पहिला इंडिया वाइन अॅवॉर्ड-२०१७’ मिळाला आहे
पाणी साठवण, संवर्धनाकरिता ‘सुला’च्या विविध उपाययोजना नाशिक : पृथ्वीवरील पर्यावरण ग्लोबल वाॅर्मिंगच्या विळख्यात सापडलेले असतांना दिवसेंदिवस कमी होत जाणारे पर्जन्यप्रमाण ही महाराष्ट्रासाठी एक गंभीर समस्या बनत आहे.उद्योगजगताचा विस्तार होत असल्याने पाण्याची गरज देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्यासोबतच पावसाचे पाणी साठवणे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language